पहलगाम हल्ल्याचा सचिन, कोहलींने केला निषेध

0
3

दि . २३ ( पीसीबी ) – रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे काल(२२ एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेत २६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यातील बहुतेक बळी देशाच्या विविध राज्यातील आणि काही परदेशी पर्यटक आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. भारतीय क्रिकेट विश्वातील सध्याच्या आणि माजी खेळाडूंनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. आणि पीडित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसंच, लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, शुभमन गिल, हार्दिक पंड्या आणि युवराज सिंग यांच्यासह अनेक खेळाडूंचा समावेश आहे.