पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी हंगामी प्राणिशास्त्रज्ञ, सुपरवायझरची नियुक्ती

0
243

पिंपरी दि. २९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय व पशुवैद्यकीय दवाखाने आणि प्राणी शुश्रूषा केंद्रात हंगामी स्वरूपात सहा महिन्यांसाठी मानधन तत्त्वावर आठ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. प्राणिशास्त्रज्ञाला दरमहा 30 हजार रुपये, तर अॅनिमल किपर, सुपरवायझरला 24 हजार व आरोग्य निरीक्षकाला 25 हजार 500 रुपये वेतन दिले जाणार आहे.

पिंपरी -चिंचवड पालिका पशुवैद्यकीय विभागाअंतर्गत पशु रुग्णालय, प्राणी शुश्रूषा केंद्र आणि प्राणिसंग्रहालयाचे कामकाज पाहिले जाते. यासाठी तांत्रिक मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. मानधनावर पशुवैद्यक, पशुवैद्यकीय अधिकारी, क्युरेटर, पशुशल्यचिकित्सक या पदाचे उमेदवार 6 महिन्यांसाठी हंगामी स्वरुपात घेण्याची प्रक्रिया जाहिरात प्रसिद्ध करुन राबविण्यात येते.

त्याअनुषंगाने महापालिकेच्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयात एक प्राणिशास्त्रज्ञ तथा शैक्षणिक अधिकारी (बायोलॉजिस्ट) आणि दोन अॅनिमल किपर पदांवर तसेच पशुवैद्यकीय दवाखाने आणि प्राणी शुश्रूषा केंद्र येथे तीन लाईव्ह स्टॉक सुपरवायझर आणि 2 आरोग्य निरीक्षक 6 महिन्यांसाठी हंगामी स्वरूपात मानधन तत्त्वावर घेण्यात पशुवैद्यकीय विभाग येणार आहेत. प्राणिशास्त्रज्ञाला दरमहा 30 हजार रुपये वेतन, तर अॅनिमल किपरला 24 हजार 10 रुपये, लाईव्ह स्टॉक सुपरवायझरला 24 हजार 10 रुपये आणि आरोग्य निरीक्षकाला 25 हजार 500 रुपये वेतन दिले जाणार आहे.