‘पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रेचा निगडीतील भक्ती शक्ती समूह शिल्प येथे समारोप

0
310

पिंपरी, दि. १ (पीसीबी) -मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्याची माती, मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मराठवाडा जनविकास संघ व मराठवाडा भूमिपुत्र पिंपरी-चिंचवड शहर यांच्या संयुक्तपणे आयोजित स्वामी रामानंद तीर्थ जन्मस्थळ ते समाधीस्थळ ‘पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रेचा समारोप निगडीतील भक्ती शक्ती समूह शिल्प येथे करण्यात आला. या यात्रेची संकल्पना नितीन चिलवंत यांची होती.

यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, ह.भ.प. बब्रुवान वाघ महाराज, ह.भ.प. तांदळे महाराज, ह.भ.प. प्रा. गजानन वाव्हळ महाराज, समाज प्रबोधन‌कार शारदाताई मुडे, नितीन चिलवंत, आण्णा मोरे, रेश्मा चिलवंत, जीवन बोराडे, राजेन्द्र गाडेकर दिलीपराव देशमुख बारडकर, देविदास सांगळे, शंकर तांबे, प्रकाश इंगोले, डी.एस. राठोड, धनाजी येळेकर, वामन भरगंडे, सोमनाथ झुमके, सतीश काळे, माचींद्र चिंचोले, सुर्यकांत कुरुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

देशभक्तीचे स्फुल्लींग मनामनात जागवण्यासाठी व जन्मभूमीची नाळ घट्ट करण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिर श्रीक्षेत्र देहूगाव येथून सुरू झालेली ‘पवित्र माती मंगल कलश यात्रा’ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर आळंदी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी, स्वामी रामानंद तीर्थ जन्मभूमी सिंदगी (जि. विजापूर), गुलबर्गा, बिद, विजापूर , गाणगापूर , धाराशिव, तुळजापूर, लातूर, बीड, संभाजीनगर, आपेगाव, पैठण, वेरूळ, जालना, राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेड राजा, परभणी, संत साईबाबा जन्मस्थान पाथरी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, अकोला मार्गे पिंपरी- चिंचवडमधील भक्ती शक्ती शिल्प येथे यात्रेचा समारोप करण्यात आला.