पवार घराणे म्हणजे स्वतःची जहागिरी समजून….. सदाभाऊ खोत यांची रोहित पवारांवर खोचक टीका

0
8

मुंबई, दि. १९ (पीसीबी) : सदाभाऊ खोत यांनी रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सदाभाऊ खोत म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये गावगाड्यांना घेऊन, विस्थापनांना घेऊन 18 पगड जाती, बारा बलुतेदार, आलूतेदार यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता फक्त देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि त्यांचे दूरपल्याचे नेतृत्व आहे. देवेंद्र फडणवीस म्हणजे लंबी रेस का घोडा आहे आणि हे पवार घराण्याला माहीत आहे. कारण पवार घराणे म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राचं सत्ताकारण स्वतःची जहागिरी समजून आतापर्यंत राजकारण करत आलेलं आहे. महाराष्ट्र काही आंधळा नाही आहे, महाराष्ट्र बहिरा नाही आहे. तुमच्या घरात दोनदोन खासदार, तीन, चार आमदार. तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राची सत्ता पाहिजे आहे, देशाची सत्ता पाहिजे आहे.

एवढी जनतेची सेवा करण्याची तल्लभ तुम्हाला का यावी? याचे उत्तर तुम्हाला पहिल्यांदा द्यावे लागेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, दऱ्याखोऱ्यामध्ये आमदार होण्यासाठी, खासदार होण्यासाठी काय लेकरं बाळ जन्माला आलेली का नाही याचेही उत्तर खऱ्या अर्थाने रोहित पवारांनी दिले तर बरे होईल. महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभा करण्याचं काम त्या आंदोलनातून समाजाला काही का नाही मिळू देत पण आम्हास सत्ता मिळाली पाहिजे. प्रश्न सोडवायला सरकार तयार असले तरी ते प्रश्न सुटता कामा नये अशा पद्धतीची व्यवस्थापना खऱ्या अर्थाने रोहित पवार आणि राष्ट्रवादी त्यांच्या पक्षाने केलेली आहे.

मराठा आरक्षण डब्ल्यू एस मधून आरक्षण आदरणीय मोदी साहेबांनी दिले, दहा टक्के आरक्षण शिंदे साहेबांनी दिले. आमच्या सरकारने दिले. अनेक योजना दिल्या एवढं सगळं दिले असतानासुद्धा या महाराष्ट्रामध्ये रोहित पवार आणि कंपनी जाती-जातींमध्ये आग लावत सुटलेली आहे. खऱ्या अर्थाने याचे नामकरण भविष्यकाळामध्ये आगलावे असेच होईल.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, रोहित पवारांना मी सांगू इच्छितो की, आपला जन्म हा तोंडात सोन्याचा चमचा घेऊन झालेला आहे. वाड्यात झाला आहे आणि गोपीचंद पडळकर या व्यक्तीमत्वाचा जन्म हा दुष्काळी भागामध्ये करपलेल्या चेहऱ्यांच्यामध्ये गावगाड्यामध्ये झालेला आहे. हा त्याच्यात आणि तुमच्यात फरक आहे. गोपीचंद पडळकर हा संघर्षातून उभा राहिलेला नेतृत्व आहे आणि तुम्ही मात्र कुणाच्यातरी मांडीवरती कृपाछायेखाली वाढलेलं नेतृत्व आहे. असे सदाभाऊ खोत म्हणाले.