पवना सहकारी बँकेवर अण्णासाहेब मगर पॅनलचा एकतर्फी दणदणीत विजय

0
802

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात जुनी बँक म्हणून नावलौकीक असलेल्या पवना नागरी सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचा एकतर्फी असा दणदणीत विजय झाला आहे. रविवारी झालेल्या मतदानावर आज मतमोजणी झाली आणि दुपारी निकाल जाहीर करण्यात आला.

विजयी उमेदवारांमध्ये पॅनल प्रमुख ज्ञानेश्वर लांडगे यांच्यासह व्हि.एस. काळभोर, शांताराम गराडे, जयनाथ काटे, शाम फुगे, शिवाजी वाघेरे, शरद काळभोर, जितेंद्र लांडगे, अमित गावडे, सचिन चिंचवडे, प्रा.सचिन काळभोर, चेतन काळभोर, सुनिल गव्हाणे, बिपीन नाणेकर हे सर्व १४ उमेदवार सर्वसाधारण गटातून जिंकले. महिला आरक्षणातून जयश्री गावडे, उर्मिला काळभोर यांनी तर अनुसुचित जातीसाठी दोदू डोळस यांची निवड करण्यात आली. हे विजयी झाले. इतर मागास वर्गातून वसंत लोंढे आणि भटके विमुक्त प्रवर्गातून संभाजी दौंडकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. प्रचार प्रमुख संजोग वाघेरे यांनी त्याबाबतची माहिती दिली.

तब्बल २२ शाखा, ६७० कोटींच्या ठेवी आणि १२०० कोटींची उलाढाल असलेली ही बँक शहरातील अग्रगण्य सजमली जाते. भोसरी, चिंचवड, पिंपरी, आकुर्डी येथील गाव सरपंचांनी मिळून ७२ वर्षांपूर्वी सर्वसामान्य नागरिकांसाठी या बँकेची स्थापन केली होती. आता नावारूपाला आलेल्या या बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नेहमी बिनविरोध होत असे. यावेळी अनेकांनी दावा केल्याने मतभेद झाल्याने निवडणू घ्यावी लागली. विरोधातील विलास भोईर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमधून एकही उमेदवार विजयी झाला नाही.