पवना नदीत सोडले जातेय ड्रेनेजचे पाणी; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष – श्रीरंग बारणे

0
336

नवी दिल्ली, दि. 19 (पीसीबी)- रावेत बंधाऱ्यापासून ते मोरया गोसावी घाटापर्यंत ड्रेनेजचे पाणी थेट पवना नदीच्या पात्रात सोडले जाते. त्याकडे महापालिका अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. नदीपात्रामध्ये सोडल्या जाणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे पाणी अशुद्ध होते. दुर्गंधी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे नैसर्गिक जीवितहानी होत आहे. जलचर प्राणी मृत पावले जात आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष्य देण्याची सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना पत्र पाठविले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, पवना नदी पिंपरी-चिंचवड शहरातून वाहते. शहरातून वाहणाऱ्या पवना नदीचे पात्र 24 किलो मीटर आहे.
पवना नदी क्षेत्रातील केजुदेवी बंधाऱ्याजवळ मोठ्या संख्येने मृत मासे आढळले आहेत. पवना नदी पात्रातील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. रावेत बंधाऱ्यापासून ते मोरया गोसावी घाटापर्यंत ड्रेनेजचे पाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. त्याकडे महापालिका अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.

नदीपत्रातील पाणी अशुद्ध झाले आहे.  दुर्गंधी मोठ्या प्रमाणे होत असल्यामुळे नैसर्गिक जीवितहानी होत आहे. बंधाऱ्यातील पाणी दुषीत झाल्याने मासे व इतर जलचर प्राणी मृत पावले आहेत. ही बाब गांभीर्याने घ्यावी.  पवना नदीपात्रातील पाणी हे पिंपरी-चिंचवडकरांसाठी पिण्यासाठी वापरले जाते. नदीपात्रातील पाणी अशुद्ध होत असल्याकारणाने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. पवना नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. पवनमाई सुंदर, स्वच्छ ठेवण्यासाठी तातडीने कठोर पाऊले उचलावीत. आपण स्वतः याकडे गांभीर्याने लक्ष्य द्यावे.  योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली आहे.