पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

0
275

शिरगाव, दि. २० (पीसीबी) : पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या एका दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारला. यामध्ये पोलिसांनी एक लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. ही कारवाई सोमवारी (दि. 19) सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास करण्यात आली.

सोनी कृष्णा राजपूत (वय 22, रा. शिरगाव, ता. मावळ) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार योगेश नागरगोजे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिरगाव पोलिसांनी छापा मारून दारू भट्टीवर कारवाई केली. यामध्ये एक लाख 21 हजार रुपये किमतीची दारू तयार करण्यासाठी लावलेले गुळ मिश्रित रसायन पोलिसांनी नष्ट केले. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.