पवना नदीच्या काठावर असलेल्या दारूभट्टीवर गुन्हेशाखेचा छापा

0
464

पिंपरी दि. २१ (पीसीबी) – शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर सुरु असलेल्या एका दारू भट्टीवर गुन्हे शाखा युनिट पाचने छापा मारून कारवाई केली. यात पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 19) दुपारी बारा वाजताच्या सुमारास करण्यात आली.

चंदर ईश्वर राजपूत (वय 23, रा. शिरगाव, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार शामसुंदर गुट्टे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली. त्याने पाच लाख रुपयांचे पाच हजार लिटर दारू बनविण्यासाठी रसायन बनवले. याबाबत माहिती मिळाली असता गुन्हे शाखा युनिट पाचने छापा मारून कारवाई करत पाच लाखांचा मुद्देमाल नष्ट केला. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.