पवना धरण 91% भरलेले, पुन्हा विसर्ग सुरू

0
131

दि.१ ऑगस्ट (पीसीबी) – पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की पवना धरण सद्यस्थितीत 91% भरलेले असून पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला आहे. पाणी पातळीत व धरणाच्या येव्यामध्ये होणारी वाढ विचारात घेता धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता आज दुपारी 1:00 वाजता पवना धरणाच्या सांडव्यावरून 1800 cusecs इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत जलविद्युत केंद्रामधून विदुयतगृहाद्वारे 1400 cusecs इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग सुरू असून एकुण 3200 cusecs इतक्या क्षमतेने नदी पात्रामध्ये विसर्ग होणार आहे. पाणलोट क्षेत्रात होणा-या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्यात येईल.
तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत.
सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास/प्रशासनास सहकार्य करावे.
—————————————-
पवना धरण पूरनियंत्रण कक्ष