पवना धरण ७२ % भरले,विसर्ग 400 क्युसेक्सने सुरू

0
3

दि . ५ ( पीसीबी ) – पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की पवना धरण सद्यस्थितीमध्ये 72% भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे.
तरी, धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता आज दुपारी 12:00 वाजले पासून सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये नियंत्रित पद्धतीने मुक्त विसर्ग करण्यात येणार आहे. प्रथम सांडव्यावरील विसर्ग 400 क्युसेक्स इतका राहणार असून, सदरील विसर्ग हा दि. 15/07/2025 पर्यंत चालू राहणार आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग कमी/जास्त होण्याची शक्यता आहे
तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, कृपया कोणीही नदीपात्रात उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावित.
सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे.