पिंपरी, दि. 19.पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की सद्यस्थितीमध्ये पवना धरण 99.42% भरलेले असून नदीपात्रात जलविद्युत केंद्राद्वारे 1400 क्युसेक तर सांडव्याद्वारे 1460 क्युसेक असा *एकूण 2860 क्युसेक विसर्ग चालू आहे.
पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडत असून, येवा धरणात प्राप्त होत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता आज दुपारी 14:00 वाजेपर्यंत सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये होणाऱ्या विसर्गामध्ये वाढ होवून 4260 क्युसेक केला जाऊ शकतो. विसर्ग वाढले नंतर एकूण विसर्ग 5660 क्युसेक राहण्याची शक्यता आहे.
पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.
सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे.