पिंपरी दि. ११(पीसीबी) – पवना धरण परिसरात मागील चोवीस तासात 117 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 3.32 टक्क्यांनी वाढला असून धरणात एकूण 31.09 टक्के पाणीसाठा आहे. पुढील तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा पवना धरणात झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांवरील वाढीव पाणीकपातही टळली आहे.
पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.
पवना धरणातील पाणीसाठा!
# गेल्या 24 तासात झालेला पाऊस = 117 मि.मि.*
# 1 जूनपासून झालेला पाऊस = 767 मि.मि.*
# गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 572 मि.मि.*
# धरणातील सध्याचा पाणीसाठा = 31.09 टक्के*
# गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 33.60 टक्के*
# गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= 3.32 टक्के
# 1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 14.25 टक्के*