पवना धरणातून पाण्याचा विसर्ग

0
280

पवनानगर, दि. १३ (पीसीबी) – पावसाचा जोर वाढल्याने आज (मंगळवारी) सकाळी नऊ वाजल्यापासून पवना धरणातून 1400 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. पवना नदी तिरावरील सर्व गावातील नागरिकानी सर्तक रहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जुलै महिन्याच्या मध्यापासून जोरदार हजेरी लावली. धुंवाधार पाऊस पडला. त्यामुळे धरणातील येवा वाढला. अनेकवेळा पाण्याचा विसर्ग करावा लागला. मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर पुन्हा पवना धरण परिसरात पावसाने हजेरी लावली. धरणात सध्या 100 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणा-या पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आज सकाळी नऊ वाजल्यापासून धरणाच्या वीज र्निमिती संचाद्वारे 1400 क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.