पवनामाईचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते जलपूजन

0
2

दि . १८ . पीसीबी – पिंपरी – पिंपरी-चिंचवडसह मावळवासींयाची तहान भागविणारे पवना धरण ९५ टक्के भरले आहे. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आज (शनिवारी) जलपूजन करण्यात आले. वर्षभर पुरेल एवढे पाणी धरणात असून शहरवासीयांची वर्षेभराची पाण्याची चिंता मिटली आहे. धरणातील गाळ काढल्याने पाणी साठवण क्षमता वाढल्याचे खासदार बारणे म्हणाले.

यावेळी पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, संत तुकाराम सहकार साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण भालेराव, कांता रसाळ, शिवसेना तालुका प्रमुख राजाभाऊ खांडभोर, उपतालुका प्रमुख राम सावंत, चंद्रकांत भोते, धनंजय नवघने, अमित कुंभार, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख सुदर्शन देसले, तळेगाव शिवसेना शहर प्रमुख देव खरटमल, नवनाथ हरपुडे, प्रवीण ढोरे, मदन शेडगे व मोठ्या संख्येने ग्रामस्त उपस्थित होते.

पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना पाणीपुरवठा केला जातो. ६ एमएलडीपेक्षा अधिकचे पाणी शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी वापरले जाते. शहराचा पाणी पुरवठ्याचे पवना धरण मुख्य स्त्रोत आहे. धरणातील पाण्याची क्षमता वाढण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून खासदार श्रीरंग बारणे यांच्यावतीने धरणातील गाळ काढला जातो. त्यामुळे धरणातील साठवण क्षमता वाढली. गाळ काढल्यामुळे पाणीसाठा अधिकचा राहत आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडकरांवरील पाणीसंकट टळले. काही वर्षांपूर्वी दोन दिवसाआड पाणी मिळत होते. परंतु, गाळ काढल्यामुळे धरणातील साठवण क्षमता वाढली असून शहरवासीयांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत नाही.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ” मागील आठ वर्षांपासून धरणातील ८५ हजार क्युबिक मीटर गाळ काढला आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठवण क्षमता वाढली आहे. पवना धरणात ९५ टक्के पाणीसाठा आहे. वर्षभर पुरेल एवढे पाणी धरणात आहे. पवना नदी सुधार प्रकल्प राबविण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला यश आले आहे. पीएमआरडीए आणि पिंपरी-चिंचवड महापालिका नदी सुधार प्रकल्प राबविणार आहे.नदी स्वच्छ रहावी, नदी काठच्या गावात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यामुळे नदी पात्रात अशुद्ध पाणी जाणार नाही. नागरिकांना आणखी शुद्ध पाणी मिळेल. महापालिकेचा पाणी शुद्धीकरण करण्याचा खर्च कमी होईल.””