दि.३१ (पीसीबी) – मुंबईच्या पवईमधील ओलिस नाट्यप्रकरणी आरोपी रोहित आर्य याच्याविषयी नवी माहिती समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानाअंतर्गत ‘प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर’ या प्रकल्पाचे तो संचालक होता. ‘शालेय शिक्षण विभागाने स्वच्छता मॉनिटर अभियान गुंडाळल्याने ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले’, असा दावा रोहित आर्यने केला होता. या प्रकरणी त्याने तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊनही फायदा झाला नसल्याचे म्हटले होते. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी २० कोटी ६३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती, मात्र सरकार पैसे देत नसल्याने त्याने यापूर्वी आझाद मैदानावर उपोषणही केले होते. सततच्या तणावातून तो उपचार घेत असल्याचेही समोर आले आहे.
मुंबईतील पवईतील ओलीस प्रकरणातील आरोपी संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना रोहित आर्यने उपोषण केलं होतं. स्वच्छता मॉनिटर अभियानात सरकारने पैसे थकवल्याचा आरोप रोहित आर्यने केला होता 12 जानेवारी 2024 रोजी शासन आदेश काढून रोहित आर्यची प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर अभियानाच्या प्रकल्पाच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी 20 कोटी 63 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी प्रोजेक्ट लेट्स अंतर्गत रोहित आर्यवर होती.
रोहित आर्यच्या मागण्या काय होत्या?
– शालेय शिक्षण विभागाने स्वच्छता मॉनिटर अभियान गुंडाळल्याने नुकसान झाल्याचा दावा रोहित आर्याने केला होता. 
– 45 लाख रुपये बुडवल्याचा रोहितचा आरोप होता. 
– रोहित आर्याने काही दिवसांपूर्वी आझाद मैदानातही उपोषण केलं होतं. 
– तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊनही फायदा न झाल्याचा दावा आर्याने केला होता. 
– काही दिवसांपासून तणावात असल्याने उपचार घेत असल्याची माहिती आहे.
रोहित आर्याने दिपक केसरकरांच्या बंगल्याबाहेर केलं होतं आंदोलन
काही दिवसांपूर्वी माजी शालेय मंत्री दिपक केसरकर यांच्या घराबाहेर आंदोलन केलं होतं. रोहीत आर्य हा नागपूरच्या शाळेत प्राध्यपक असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने नागपूरमध्ये एक स्वच्छता मोहीम राबवली होती. त्यावेळीच्या शालेयमंत्री दिपक केसरकर यांनी हा निधी त्याला त्यावेळी दिला नाही. त्याने स्वखर्चाने ६० ते ७० लाख रुपये खर्च केला होता. हा निधी न मिळाल्याने रोहित आर्याने आंदोलन केलं होतं. दीपक केसरकर यांच्या शासकीय बंगल्याबाहेर त्याने आंदोलन केलं होतं. एवढंच नाहीतर रोहित आर्यने आझाद मैदानात देखील आंदोलन केलं होतं.
 
             
		












































