पल्सर दुचाकीची मोपेड दुचाकीला धडक; भोसरीत एकजण गंभीर जखमी

0
212

भोसरी , दि. ३ (पीसीबी) : पल्सर दुचाकीने एका मोपेड दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये मोपेड दुचाकीवरून जाणारा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना 30 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास खडी मशीन रोड, भोसरी येथे घडली.

वेदांत चंद्रकांत पालवे (वय 21, रा. पिंपळे गुरव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत संजय थोरात (रा. सोळू, आळंदी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पालवे त्यांच्या मोपेड दुचाकी (एमएच 14/केझेड 5860) वरून आळंदी येथून भोसरीच्या दिशेने खडी मशीन रोडने जात होते. त्यावेळी आरोपी अनिकेत हा त्याच्या पल्सर दुचाकी (एमएच 14/केएच 4810) वरून भरधाव आला. त्याने पालवे यांच्या दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. या अपघातात पालवे यांच्या जिभेला, छातीला, पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.