पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला मोशी घाटावर मोठा प्रतिसाद

0
8

दि.८(पीसीबी) -इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती मोहिमेअंतर्गत अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल या संस्थांनी सलग ९ वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा उपक्रम राबवून निसर्गसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. यंदा गणपती विसर्जनाच्या दिवशी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी गणपती मूर्ती दान, निर्माल्य दान उपक्रमात सहभाग घेतला.यासाठी मदत करून निसर्ग सेवा व पर्यावरण संरक्षणाचा मान लुटला.मोशी घाट, इंद्रायणी नदी येथे हा उपक्रम पार पडला.

या उपक्रमामुळे नदी प्रदूषण कमी होण्यास हातभार लागला.मूर्ती व निर्माल्य योग्य पद्धतीने संकलित केल्या. स्थानिक नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक सण साजरा करण्याची जनजागृती झाली.संस्थांच्या प्रतिनिधींनी सचिन भैय्या लांडगे , वैद्य निलेश लोंढे यांनी सांगितले की “गणेशोत्सव हा आनंदाचा सण असला तरी पर्यावरण रक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. निसर्गाशी सुसंगत संस्कार रुजवणे ही काळाची गरज आहे.”सलग ९ वर्षे राबविला जाणारा हा उपक्रम आता इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती मोहिमेचा प्रमुख भाग बनला असून स्थानिक समाजाकडून त्याचे कौतुक होत आहे.