परिश्रमाने अडचणीवर मात करता येते – रामदास पन्हाळे

0
181

पिंपरी, दि. ४ (पीसीबी)- परिश्रम आणि जिद्दीने सर्व अडचणीवर मात करता येते असे मत प्रसिद्द उद्योजक रामदास पन्हाळे यांनी व्यक्त केले.श्री नागेश्वर विद्यालय मोशी येथील सेवानिवृत्त होत असलेल्या इंग्रजी विषय शिक्षिका ज्योती जगनाडे यांच्या सेवापुर्ती समारंभाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.यावेळी प्राचार्य आप्पासाहेब कळमकर, श्री वाघेश्वर विद्यालयाचे प्राचार्य संपत धावडे ,कविता आल्हाट,राजर्षी शाहू बँकेचे संचालक सचिन पन्हाळे,संजय जगनाडे ,मराठी चित्रपट अभिनेते दत्ता उबाळे,शिवाजी अंबिके,हिराबाई जगनाडे,प्रकाश शिंदे,संज्योती चौधरी ,संप्रती राऊत आदि उपस्थित होते.

रामदास पन्हाळे म्हणाले ज्योती जगनाडे यांनी शिक्षिका होण्यासाठी खूप संघर्ष केला.त्याकाळात घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असतानाही केवळ जिद्द आणि परिश्रम घेऊन त्यांनी शिक्षण पूर्ण केले.आजच्या पिढीसाठी हा एक आदर्शच आहे.असे ते म्हणाले.

शिक्षकांच्यावतीने कविता बुरुड यांनी ज्योती जगनाडे यांना शुभेच्छा दिल्या.तर अभिनेते दत्ता उबाळे यांनी शिक्षण घेत असताना जगनाडे यांनी केलेल्या सहकार्याची आठवण करून दिली.शालेय विद्यार्थिनी हर्षदा तांबे हिने शाळेतील आठवणींना उजाळा दिला.मानपत्राचे वाचन संध्या वाळुंज सूत्रसंचालन शरद वाजे व भारती फुगे यांनी केले.तर आभार भानुदास आल्हाट यांनी मानले.