परिक्षार्थी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आशा शेंडगे यांचा अभिनव उपक्रम

0
293

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परिक्षा गुरुवारी सुरू झाल्या. राज्यातून २३ हजार शाळांतून तब्बल १५ लाख ७७ हजार विद्यार्थी या परिक्षेला बसले आहेत. कासारवाडी येथील परिक्षा केंद्राजवळ या विद्यार्थ्यांनी शुभेच्छा देताना माजी नगरसेविका आणि पेशाने शिक्षिका असलेल्या आशा शेंडगे आणि पालकवर्ग.

 माघ्यमिक शालंत परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थींना परीक्षेसाठी शुभेच्छा देताना भारतीय योग संस्था,चैतन्य हास्य कल्ब, आनंद जेष्ठ नागरीक संघ व सौ आशा धायगुडे शेंडगे. याप्रसंगी विद्यार्थींना औक्षण करून पेन व गुलाब पुष्प देत शुभेच्छा देण्यात आले. साधारण ३५०-४०० विद्यार्थींना पेन देण्यात आले. छत्रपती शाहु महाराज विद्यालय कासारवाडी येथील केंद्रावर सदर कार्यक्रम संपन्न झाला. मागील अनेक वर्षां पासुन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे व प्रोत्सान देण्याचा यशस्वी प्रयत्न या कार्यक्रमातुन साधता येतो.