पराभव कर्नाटकात, खदखद पिंपरी चिंचवडमध्ये

0
247

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – कर्नाटकातील पराभव भाजपच्या गल्ली ते दिल्लीतील भाजप नेते कार्यकर्त्यांना चांगलाच झोंबलाय. आता त्या पराभवाची कारणमिंमासा सुरू आहे. इतका दारूण पराभव कशामुळे झाला हे सांगताना सगळेच सुसाट आहेत. तिथे झाले ते आपल्याकडे नको म्हणून आतातरी सुधारा, असा सुचाक इशाराही काही जणांना नेत्यांना दिलाय. पिंपरी चिंचवड शहरात स्वपक्षातील आमदारांच्या दहशतीमुळे कधीही खुलेपणाने न बोलणारे आता बिंन्धासपणे बोलू लागलेत. शहरातील भाजपचे नेते कुठे कुठे चुकतात यावर एका पाठोपाठ एक फेसबूक पोस्ट सुरू झाल्यात. उद्या पिंपरी चिंचवडमध्ये कर्नाटकापेक्षाही एकदम वाईट हालात भाजपची होऊ शकते, अशीही भिती अनेकांना व्यक्त केली आहे.

“ कर्नाटकातील पराभव फक्त हेच दाखवून देतो की, फक्त मोठ्या गाडीतील कार्यकर्त्यांना जपू नका, तर एसटी तून प्रवास कऱणाऱ्या कार्यकर्त्यालाही तितकेच जपा. बाकी हार-जित तर होतच राहते…!“, अशी पोस्ट भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र कामगार आघाडीच्या अध्यक्षा राजश्री सोनवणे-जायभाय यांनी त्यांच्या फेसबूकवर शेअर केलीय. विशेष म्हणजे त्या पोस्टवर भाजपच्याच कार्यकर्त्यांनी भरभरून लिहीले. ७० टक्के राजश्री सोनवणे यांच्या मताशी सहमत आहेत. सुधारणा करण्याची गरज अनेकांना वाटते. एकाधिकारशाहीचा परिणाम अनेकांना वाटतो. कर्नाटकातून धडा घ्या आणि बदला अन्यथा… खैर नाही… असेही अनेकांना वाटते. भाजपचे जेष्ठ नेते नामदेव ढाके यांचे कट्टर समर्थक किरण विष्णू वाल्हेकर यांनीही सौ. सोनवणे यांची पोस्ट शेअर केली. ७७ कार्यकर्त्यांनी खदखद व्यक्त केली.

नगरसेवकांच्या जीवावर आमदार राजकारण करतात, मिरवतात, ठेके घेतात. खाऊन जातो दाढीवाला आणि सापडतो मिशावाला, असा प्रकार आहे. टक्केवारी घेणाऱ्यांमुळे शहरात भाजप बदनाम झालाय. महापालिकेतील एकूण एक नगरसवेकांची कामे स्वतःच्या मर्जितील लोकांना देणाऱ्या नेत्यांमुळे भाजप धोक्यात आहे. आज वार्डात भाजप नगरसेवकांची अवस्था केविलवाणी आहे, कोणीही विचारत नाही. महापालिकेतील भ्रष्ट कारभारामुळे भाजप पूरती बदनाम झाली आता त्याचे फळ निवडणुकीत दिसेल, अशा परखड शब्दांत कार्यकर्ते बोलतात. भाजपची अंतर्गत खदखद आता बाहेर येत आहे.