परस्‍पर कर्ज काढून महिलेची फसवणूक

0
160

30 जुलै (पीसीबी) रावेत,
महिलेच्‍या नावावर चार लाख 90 हजार 561 रुपयांचे कर्ज काढून तिच्‍या खात्‍यातून एकूण सहा लाख 40 हजार रुपयांची रक्‍कम ऑनलाइन चोरून नेला. ही घटना शिंदे वस्‍ती, रावेत येथे 9 जुलै रोजी घडली.

याबाबत एका 31 वर्षीय महिलेने रावेत पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 9830960700 या मोबाइल क्रमांकावरील अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्‍या मोबाइल नंबरवर फोन आला. आपण फेडेक्स कुरिअर कंपनी तून बोलत असल्‍याचे सांगितले. तुम्‍ही पाठविलेल्‍या कुरिअरमध्ये ड्रग्ज सापडले आहे, असे सांगून नाकोटीक्स डिपार्टमेंटला कॉल फॉरवर्ड केला. त्यांनी स्काईप ओपन करण्यास सांगितले. त्‍यानंतर फिर्यादी यांच्‍या आयसीआयसीआय अकाउंट नंबरमधून एक रुपया डेबीट झाला. त्‍यानंतर आरोपीने प्री अप्रूड पर्सनल लोन क्लिक करुन फिर्यादीचे अकाउंटला 4 लाख 90 हजार 561 रुपये जमा झाले. त्यानंतर फिर्यादीचे अकाउंट मधुन 6,40 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली.रावेत पोलीस तपास करीत आहेत.