चिखली, दि. 25 (पीसीबी) : हनिमूनसाठी व्हिएतनाम या देशात जाण्यासाठी हॉलिडे पॅकेज बुकिंग करत एका तरुणाची फसवणूक केली. ही घटना ऑगस्ट 2023 ते 1 जानेवारी 2024 या कालावधीत तळवडे येथे घडली.
याप्रकरणी उदय बबन कांडेकर (वय 33, रा. त्रिवेणीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रविंद्र बाबाजी शेंडकर (रा. भक्ती प्लाझा औंध) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी हनिमूनला जाण्यासाठी सोशल माध्यमावरून पॅराडाईज हॉलिडे या ग्रुपची माहिती मिळाली. त्यांनी व्हितएनाम या देशात 9 दिवस व 8 रात्री जाण्यासाठी हनिमून पॅकेज बुक केले. त्यासाठी संशयिताला 1 लाख 60 हजार 733 रुपये ऑनलाईन दिले. मात्र, परदेशात जाण्यासाठी हनिमून पॅकेज न देता फिर्यादी यांची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
 
             
		












































