परतीचा पाऊस थैमान घालण्याची शक्यता

0
276

मुंबई ,दि.८ (पीसीबी) – राज्यभरात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पावसाने मुंबईसह राज्याला झोडपले आहे. हाच परतीचा पाऊस पुढचे काही दिवस थैमान घालण्याची शक्यता आहे. दरम्यान मागच्या दोन-तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून आले. याचबरोबर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या भागात पावसाच्या विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तर आज 8 ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट जारी केला आहे.

मुंबईसह उपनगरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस 11 आणि 12 ऑक्टोबरला विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढचे दोन दिवस मुंबईसह राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यानंतर 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत पाऊस काही दिवस तळ ठोकण्याची शक्यता
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत काही काळ पाऊस तळ ठोकण्याची शक्यता आहे. तर पुढचे काही दिवस पावसाच्या मध्यम किंवा हलक्या सरी बरसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान 10 ऑक्टोबरनंतरच मान्सून निघून जाईल आणि पावसाळा थांबणार असल्याचं हवामान विभागाच्या अधिकार्‍यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार सांगण्यात आलं आहे.
या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता –

हवामान विभागाच्या माहितीनुसार पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात होणार आहे. तर मध्य महाराष्ट्रतील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर तर विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.