पिंपरी दि.१६ – लहानपणापासूनच गरिबीतून वाढलेले, सामाजिक अन्याय, दारिद्र्य, अत्याचार या विषयांवर वारंवार लक्ष देत कामगार वर्गातील संघर्षाची धार जवळून ज्यांनी पाहिले असे कामगारांचे जीवन ” हिशोब करितो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली “
अशा असंख्य शब्दात कवी पद्मश्री नारायण सुर्वे हे यांनी कामगार चळवळीच्या संघर्षाला साहित्य रूपातून बळ दिले असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज व्यक्त केले.
पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, बांधकाम कामगार समन्वय समिती यांच्यातर्फे चिंचवड येथे महासंघाचे कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी माध्यमप्रमुख उमेश डोर्ले, सलीम डांगे,ओमप्रकाश मोरया,कालिदास भोसले, दिनेश साखरे, हनुमंत शिंदे,अतुल कागदे,रेणुका कदम, अंजली जाधव आदी उपस्थित होते .
नखाते पुढे म्हणाले की मुंबईतील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील स्वतःच्या संगोपनातून
लक्षणीय प्रेरणा घेतली. मध्ये प्रसिद्ध झालेला “कर्णभूमी” हा काव्यसंग्रह ही त्यांची सर्वात प्रसिद्ध रचना आहे आणि मराठी साहित्याला कलाटणी देणारा आहे.त्यांच्या लिखाणाव्यतिरिक्त, सुर्वे हे एक सामाजिक कार्यकर्ते होते ज्यांनी अनेक कामगार आणि शेतकरी संघर्षात भाग घेतला होता. आयुष्यभर, ते सामाजिक न्यायासाठी झगडत राहिले आणि त्यांच्या लेखनाचा भारतीय लेखक आणि सामाजिक,कामगार कार्यकर्त्यांच्या पिढ्यांवर प्रभाव पडत राहिला.कविवर्य म्हणतात “हरघडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले, तेव्हां अश्रूच मित्र होऊन सहाय्यास आले.”