`पदवी` प्रकऱणात अजित पवार नरेंद्र मोदींच्या बरोबर

0
282

मुंबई, दि. ३ (पीसीबी) : महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर येथील जाहीर सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या शैक्षणिक पदवीवरुन हल्लाबोल केला होता. यावेळी त्यांनी अनेकजण पदव्या दाखवतात पण किंमत मिळत नाही. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांना पदवी दाखवा म्हणून विचारणा केली तर 25 हजारांचा दंड बसतो अशी टीका केली होती.

यानंतर संजय राऊतांनीही मोदींच्या पदवीवरुन टोला लगावला होता. मात्र, आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पदवीवरुन टीका करणाऱ्यांना परखड बोल सुनावले आहेत.
अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील उध्दव ठाकरेंच्या विशेष खुर्चीपासून ते पंतप्रधानांच्या डिग्रीपर्यंतच्या विविध घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली. राज्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या डि-लीट पदवीवरून टीका झालेली आहेत. यावरून राजकारण सुरू झालेले आहे. पवार यांनी यावेळी मोदींच्या पदवीवर टीका करणाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी त्यांनी मोदींचं कौतुक तर केलेच शिवाय पदवीसंदर्भातील वादात त्यांची बाजूही घेतली.

पवार म्हणाले, 2014 ला त्यांची डिग्री बघून लोकांनी निवडून दिलं का? 2014 ला पंतप्रधान मोदींनी त्यांचा स्वतःचा असा करिष्मा दाखविला. तसेच जो भाजपाचा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता. त्याचं सर्वस्व श्रेय नरेंद्र मोदींना दिलं पाहिजे. लोकशाहीत बहुमताच्या आकड्याला,आदराला महत्व आहे. देशात ५४३ खासदार ज्यांच्याकडे आहेत, तो पंतप्रधान होतो. तर, राज्यात १४५ चं बहुमत असेल तर तो मुख्यमंत्री होतो असं पवार यावेळी म्हणाले.

जो भाजपाचा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता. त्याचं सर्वस्व श्रेय नरेंद्र मोदींना दिलं पाहिजे. लोकशाहीत बहुमताचा आदराला महत्व आहे. देशात ५४३ खासदार ज्यांच्याकडे आहेत, तो पंतप्रधान होतो. तर, राज्यात १४५ चं बहुमत असेल तर तो मुख्यमंत्री होतो असं विरोधी पक्षनेते पवार यांनी सांगितलं आहे. पण आज याच्या डिग्र्या, त्याच्या डिग्र्या काढणं हा प्रश्न महत्त्वाचा आहे का? यापेक्षा गॅस सिलिंडर, महागाई, बेरोजगारी त्याबद्दल बोलायचं नाही कुणी चर्चा करायची नाही असा हल्लाबोल पवार यांनी केला आहे.