पदग्रहण सोहळा ‘आप ‘ पदाधिकारांचा

0
352

पिंपरी, दि. ६ (पीसीबी )- आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवड मधील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा काल आकुर्डी येथील आम आदमी पार्टी च्या कार्यालया मध्ये मोठ्या उत्साहात पार पडलायावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटन वाढविण्यासाठी तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तेत येण्यासाठी अतिशय जोमाने काम करण्याचा संकल्प केला.

आप महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री अजित फाटके पाटील व आप पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रकाश हगवणे ह्यांनी सूत्रसंचालन केले.

तसेच आप पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष संतोष इंगळे यांनी शहरात पार्टी मध्ये महिला आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी मोठे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

ह्यावेळी शहरामधील अनेक महत्त्वाच्या व्यक्तीने पक्षप्रवेश केला, त्यांचे स्वागत व पक्ष प्रवेश अजित फाटके,चेतन बेंद्रे, संतोष इंगळे ह्यांच्या हस्ते झाले. ह्याचे सूत्रसंचालन राज चाकने यांनी केले.

सर्व आघाडी प्रमुखांनी ह्यावेळी आपले मनोगत व्यक्त केले व पक्ष वाढीसाठी जोरात काम करणार असल्याचे सांगितले. त्याच प्रमाणे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले की त्यांनी यावेळी आम आदमी पक्षाला साथ द्यावी.