पत्राचाळ घोटाळा प्रकऱणात संजय राऊत यांना २२ ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी

0
639

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना आज पीएमएलए न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. न्यायालयाने त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मागील काही दिवसांपासून ते ईडी (सक्तवसुली संचालनालय) कोठडीत होते. पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी केली होती.

पीएमएलए कायद्यानुसार, संजय राऊत यांना आज पुन्हा ईडी कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडीत पाठवलं जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण न्यायालयाने संजय राऊत यांना काहीसा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना २२ ऑगस्टपासून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.