पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, हभप शिरीष महाराज मोरे यांना हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचा पुरस्कार

0
78

पिंपरी, दि. ३ – हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा स्व. प्रा. एकनाथजी नाणेकर स्मृती समाजभूषण पुरस्कार शिवशंभो विचार मंचचे प्रांत संयोजक हभप शिरीष महाराज मोरे यांना तर स्व. संजय आर्य स्मृती समाजभूषण पुरस्कार पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांना जाहीर झाला आहे.
हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सव व विजयादशमीनिमित्त येत्या रविवारी (दि.६) सायंकाळी पाच वाजता, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे हिंदू शौर्य दिन – विराट हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पुरस्कार वितरण होणार आहे अशी माहिती हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे सचिव उत्तम दंडीमे व कार्यक्रमाचे संयोजक सुहास पोफळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲड. अश्विनी कुमार उपाध्याय (नवी दिल्ली) यांचे ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ या विषयावर प्रबोधन पर व्याख्यान होईल. प्रमुख पाहुणे म्हणून गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये उपस्थित राहणार आहेत, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल भूषवणार आहेत.
कार्यक्रमासाठी उत्तम दंडीमे, सुहास पोफळे, राजाभाऊ गोलांडे, कैलास बारणे, दत्तात्रय सूर्यवंशी, अतुल आचार्य, कुमार जाधव, नामदेव शिंत्रे विजय गुंजाळ, दिगंबर रिद्धीवाडे, मनोज बोरसे, शिवाजी रेड्डी, मनोज गोबे दिलीप कुलकर्णी, रमेश अर्धाले आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला आहे.