पिंपरी, दि: पत्रकारिता आणि अतिशय संयमी पत्रकारिता याचा सुवर्ण मध्य साधून पत्रकारिता करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधु जोशी यांनी केले.
जेष्ठ पत्रकार श्री. माधव सहस्त्रबुद्धे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा ऑटो क्लस्टर सभागृहात खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार जोशी बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, भाजपचे जेष्ठ नेते महेश कुलकर्णी, पिंपरी चिंचवड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर, शहर पत्रकार संघाचे बापू गोरमाळी, माजी नगरसेवक शितल शिंदे, नेते यशवंत भोसले, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आझम भाई पानसरे, नगरसेवक नारायण बहिरवाडे, श्री रवी नामदेव नगर सेवक मारुती भापकर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष श्री.आबासाहेब ढवळे, डी डी फ़ुगे, शिवाजी तापकीर, श्री अशोक मंगल,श्रीकांत चौगुले पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष तात्या सपकाळ, जेष्ठ श्री.अविनाश चिलेकर, इंडियन एक्सप्रेस चे मनोज मोरे, लोकमत चे विश्वास मोरे, महाराष्ट्र टाइम्सचे सुनील लांडगे, श्री. नाना कांबळे, श्री बाळासाहेब ढसाळ, श्री विवेक इनामदार श्री प्रवीण शिर्के, अर्चना मेंगळे, श्री विशाल भाई जाधव, राजेश मेहता, आज का नंदचे विवेक गाडे अनिल वडगुले, कोकणे , दादाराव आढाव, सांतलाला यादव,बाबू कांबळे, दिनेश दुधाळ,महेश कुलकर्णी, संदेश पुजारी, श्रद्धा प्रभुणे
आदी उपस्थित होते.
यावेळी जोशी म्हणाले की, निर्भीड पत्रकारिता ही नेहमीच सत्य किंवा खरी पत्रकारिता नसते. त्याला दुसरी बाजू असते. तीही समाजापुढे येण्याची गरज आहे.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, पूर्वीची पत्रकारिता आणि आत्ताची पत्रकारिता यात खूप अंतर निर्माण झाले आहे. पत्रकारिता व्यावसायिकतेकडे झुकली आहे. अतिशय स्पष्टवक्ता निर्भीड पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर आणि कोणाशीच वाईटपणा न घेता पत्रकारिता केलेले माधव सहस्रबुद्धे ही पिंपरी चिंचवड मधील पत्रकारितेतील दोन टोकाची रूपे आहेत.पत्रकारांनी निर्भीड व स्पष्टपणे लिहावे या मताचा मी आहे असेही खासदार बारणे म्हणाले. भाऊसाहेब भोईर, नंदकुमार सातुर्डेकर, अविनाश चिलेकर, महेश कुलकर्णी, यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी बोलताना भोईर यांनी राष्ट्रवादीचा भाजप आणि भाजपचा राष्ट्रवादी झाला आहे. राजकारणाची पार वाट लागली आहे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. नाना कांबळे यांनी यांनी केले आणि सूत्रसंचालन श्री. बापूसाहेब गोरे, विशाल जाधव यांनी केले.