पत्नी आणि पत्नीच्या मित्राने पळवली साडेतीन लाखांची रोकड, पतीची पोलिसात धाव

0
221

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – पत्नी आणि तिच्या मित्राने घरातून तीन लाख 40 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी पतीने पोलिसात धाव घेत पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत महाळुंगे इंगळे येथे घडली.

गौतम रमेश सरकटे (वय 33, रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौतम यांची पत्नी आणि तिचा मित्रा संदीप गवळी (रा. सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरातून त्यांची पत्नी आणि तिचा मित्र या दोघांनी फिर्यादीच्या घरातून तीन लाख 40 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी तीन महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.