सोलापूर, दि. १६ (पीसीबी) : सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचे हनी ट्रॅप प्रकरण ताजे असतानाच शिवसेना खासदार राहुल शेवाळे हे देखील हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी राहुल शेवाळेंनी महिलेविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान तीन महिन्यापूर्वी एका महिलेने शेवाळे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली होती. त्याच महिलेच्या विरोधात शेवाळेंनी ही तक्रार दाखल केली आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. तक्रारीतील महिलेने शेवाळे यांना अनेकदा पत्र लिहून भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र शेवाळे यांनी आपल्याला खोट्या गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे.
शेवाळे यांचे वकील सुनील पांडे यांनी याबद्दल माध्यमांना माहिती दिली. त्या माहितीनुसार, संबंधित महिलेचे कुटुंबीयही यात सामील असून शेवाळे यांना धमक्या देत आहे. शेवाळे आणि महिलेमध्ये सहमतीने झालेल्या शरीर संबंधांवरूनही त्यांना धमक्या देण्यात येत आहेत. त्या प्रसंगांचे व्हिडीओ व्हायरल करून अशी धमकी शेवाळेंना देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात शेवाळेंना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा पांडे यांनी केला आहे.
दरम्यान शेवाळे यांच्याकडून संबंधीत महिलेने आत्तापर्यंत 56 लाख रुपये, आयफोनसह बारा भेटवस्तू घेतल्या आहेत. तसेच या महिलेने शेवाळेंना प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, याशिवाय पत्नीसोबत घटस्फोट घेत तिच्याशी लग्न न केल्यास त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्यातेही तक्रारीत नमूद केले आहे.
कोण आहेत राहूल शेवाळे?
शिवसेनेच्या 19 खासदारांपैकी राहुल शेवाळे प्रमुख आहेत. शिवसेनेच्या मातोश्रीच्या निकटवर्तीयांच्या यादीतही राहुल शेवाळे यांचे घेतले जाते. शेवाळेंनी गेल्या अनेक वर्षांपासून पालिका स्तरावरून शिवसेनेत सक्रिय सहभाग दर्शवला, यावेळी अणुशक्तीनगरमधून ते नगरसेवक म्हणून निवडूण आले, यानंतर 2004 मध्ये तुर्भे विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणुक लढवली मात्र यात त्यांचा पराभव झाला.
यानंतर 2010 ते 2014 हे 4 वर्षे राहुल शेवाळेंनी स्थायी समितीचे अध्यक्ष पद भूषविले. 2014 मध्ये मोदी लाटेत ते दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. यानंतर 2019 मध्येही पुन्हा राहुल शेवाळे लोकसभेत विजयी झाले. दरम्यान बंडखोर आमदारांमुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. या परिस्थितीतही शेवाळेंनी भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे मागणी पत्र उद्धव ठाकरे यांनी लिहिले होते. त्यामुळे ते राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले.