पत्नीवर १० वर्षे ५० जणांनी केला बलात्कार, आता…

0
5

दि. 20(पीसीबी) – एक हादरवून सोडणारे प्रकरण चर्चेत आले होते. पत्नीला अमली पदार्थ देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार करणे आणि तिच्यावर बलात्कार करण्यासाठी अनेक अनोळखी पुरुषांना बोलावणे, या आरोपांखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. फ्रान्समधील न्यायालयाने या प्रकरणात पीडितेच्या पतीसह इतर ५१ जणांना दोषी ठरवले आहे. त्यांनी नऊ वर्षांहून अधिक काळ तिच्यावर बलात्कार केले. न्यायालयात पती डॉमिनिक याने अमली पदार्थांचे सेवन करून पत्नीवर बलात्कार केल्याचे आणि इतर पुरुषांना बलात्कार करण्यास परवानगी दिल्याचे आरोप कबूल केले. त्याला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इतर सर्व ५० आरोपींनाही न्यायालयाने दोषी ठरवले. या ऐतिहासिक प्रकरणाने गेल्या काही महिन्यांत फ्रान्सला हादरवून सोडले आणि जगभर या प्रकरणाची चर्चा सुरू होती. न्यायालयाने या सर्वांना शिक्षा सुनावल्यामुळे या गुन्ह्यामागील ७२ वर्षीय डॉमिनिक पेलिकॉट चर्चेत आला आहे.