पत्नीला मारहाण, मेव्हणीचा विनयभंग आणि सासूला धमकी

0
815

चिखली, दि. १९ (पीसीबी) – पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेण्यापूर्वीच पतीने दुसरे लग्न केले आहे का, असा जाब विचारणाऱ्या पत्नीला मारहाण करून तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 17) सायंकाळी जाधववाडी, चिखली येथे घडली.

याप्रकरणी 25 वर्षीय पीडित विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पतीसह सासरच्या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी पती यांची घटस्फोटाची केस कोर्टात सुरु आहे. त्यांचा अद्याप घटस्फोट झाला नाही. तरीही तुम्ही दुसरे लग्न केले आहे का, असा जाब फिर्यादी महिलेने विचारला असता आरोपी पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीची बहीण आली असता आरोपींची तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. फिर्यादी महिलेच्या आईला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.