पत्नीला मारहाण केल्याचा जाब विचारला म्हणून दोघावर चाकूने वार, आरोपीला अटक

0
317

पत्नीला मारहाण केल्याचा जाब विचारला म्हणून दोघांवर घरातील चाकूने वार करत जखमी केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे., ही घटना चाकण येथील आंबेठाण रोडवर मंगळवारी (दि.9) घडली आहे.

अरविंद मारुती राठोड (वय 33 रा.चाकण) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रेमसिंग महादेव जाधव (वय 56 रा.चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पत्नीला कौटुंबीक त्रास देत होता. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी व त्याचे साथीदार योगेश गेले असता आरोपीने फिर्यादी यांना तुम्ही कोण मला विचारणारे म्हणत घरातील चाकूने फिर्यादीच्या हातावर वार केले. तसेच योगेश यांच्याही हातावर वार करत त्यांनाही जखमी केल. यावरून चाकण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.