पत्नीने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला म्हणून केली पार्किंग मधील गाड्यांची तोडफोड

0
449

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला असल्याचा रागातून एका माती फिरू नये सोसायटीमध्ये पार केलेल्या गाड्यांची तोडफोड करत तेथील नागरिकांना दमदाटी केली आहे हा सारा प्रकार रविवारी रात्री काळेवाडी येथील पंचनाथ कॉलनी येथे घडला आहे.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात आशिष बालाजी पांचाळ (वय 22 रा काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीवरून सदाशिव तुकाराम दिघे (वय 50 रा पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याचे नातेवाईक हे पंचनाथ कॉलनीतील मंगलदीप अपार्टमेंट येथे राहतात. याचा अपार्टमेंट मध्ये फिर्यादी देखील राहतात रात्रीच्या वेळी फिर्यादी हे त्यांचे आई वडील व मित्र यांच्या सोबत पार्किंग मध्ये फेरफटका मारत असताना आरोपी तेथे आला. त्याची पत्नी त्याला घटस्फोट देत असल्याच्या कारणावरून त्याने सोसायटीमध्ये पार्क केलेल्या गाड्या फोडण्यास सुरुवात केली. तसेच त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने फिर्यादी व इतरांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या हाताचा चावा त्याने घेतला. त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.