पत्नीनेच दिली पती विरोधात बलात्काराची तक्रार

0
185

अलिबाग, दि. २५ (पीसीबी) : पत्नीनेच आपल्या पती विरोधात बलात्कार केल्याची तक्रार दिल्याची बाब रायगड जिल्ह्यात समोर आली आहे. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. चार वर्षांपूर्वी दोघांचे लग्न झाले होते. तेव्हा पासून दोघेही एकाच घरात राहत आहेत.

सदर महिलेने आता आपल्या पती विरोधात बलात्कार, शिवीगाळ आणि दमदाटी केल्याची तक्रार नोंदवली आहे. पतीकडून आपल्यावर मनाविरोधात जबरदस्तीने, वारंवार शारीरिक संबंध केले गेल्याची तक्रार दिली आहे. फिर्यादी महिलेच्या तक्रारीनंतर, या प्रकरणी माणगाव पोलीस ठाणे गु.र.नं.११४/२०२४ भा.दं.वि.क.३७६,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.