पत्नीच्या प्रियकराने केली पतीला मारहाण

0
594

चाकण, दि. १ (पीसीबी) – पत्नीला घेण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या पतीला पत्नीच्या प्रियकराने बेदम मारहाण केली. ही घटना 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी येलवाडी येथे घडली.

याप्रकरणी 32 वर्षीय पतीने शुक्रवारी (दि. 30) महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार विक्रम सुरेश शेटे (रा. तांदुळवाडी, ता. बारामती, पुणे) आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या पत्नीला घेण्यासाठी दुचाकीवरून जात होते. तळेगाव-चाकण रोडवर येलवाडी येथे एच पी पेट्रोल पंपावर त्यांना पत्नीचा प्रियकर विक्रम शेटे याने अडवले. फिर्यादीस धमकी देऊन शिवीगाळ केली. फिर्यादींना लोखंडी रॉडने मारून जखमी केले. विक्रम याच्या साथीदाराने देखील फिर्यादीस मारहाण केली. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.