पत्नीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या पतीला मारहाण

0
223

पिंपरी, दि.५ (पीसीबी)- पत्नीची छेड काढणाऱ्या व्यक्तीला जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीला आठ जणांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ३) रात्री खराळवाडी पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी २७ वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उमेर समीर तांबोळी (वय १८, रा. खराळवाडी पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह साद समीर तांबोळी आणि अन्य पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या आईसोबत बोलत थांबल्या असताना आरोपी उमेर याने त्यांच्याकडे पाहून अश्लील हातवारे केले. हा प्रकार त्यांनी पतीला सांगितला. त्यानंतर फिर्यादी यांचे पती घडलेल्या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी आरोपीकडे गेले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांच्या पतीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी उमेर हा फिर्यादी यांचा वारंवार पाठलाग करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.