पत्नीची कार स्वतःच्या नावावर करून विकली; पती आणि सासूवर गुन्हा दाखल

0
136

मोशी, १७ जुलै (पीसीबी) – पत्नीची कार स्वतःच्या नावावर करून पतीने आणि सासूने कारची परस्पर विक्री केली. हा प्रकार 25 फेब्रुवारी 2022 ते मे 2022 या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी येथे घडला.पती अनिकेत अविनाश नलावडे (वय 33, रा. शिरगाव), सासू (वय 56, रा. निगडी प्राधिकरण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिकेत याच्या पत्नीने (वय 30, रा. भोसरी) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 16) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या नावावर असलेली कार (एमएच 14/जेआर 8676) त्यांच्या संमतीशिवाय त्यांचे पती अनिकेत यांनी स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या नावावर करुन घेतली. त्यासाठी ट्रान्सफर फॉर्मवर अनिकेत यांनी फिर्यादी यांच्या खोट्या सह्या केल्या. त्यानंतर ती कार आठ लाख रुपयांना विकून फिर्यादीची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.