पती सोबत राहत नाही म्हणून पत्नीकडून पतीला मारहाण

0
271

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पती बरोबर राहत नसल्याने पत्नीसह दोन महिलांनी पतीला बेदम मारहान केली. मंगळवारी (२७ डिसेंबर) चऱ्होली बुद्रुक येथे ही घटना घडली.

या प्रकरणी पिडीत पतीने बुधवारी (२८ डिसेंबर) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन महिला आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती सोबत राहत नाही याचा राग मनात धरून पत्नीने आपल्या महिला साथिदारासोबत संगणमत करून पतीला बेदम मारहान केली. लाथाबुक्क्या, दगडविटा तसेच रॉडने मारत पतीला जखमी केले. दिघी पोलिस तपास करत आहेत.