पती व सासूच्या छळाला कंटाळून विवाहितेचे सहव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

0
86

 ताथवडे, दि. ३० ऑगस्ट (पीसीबी) – लग्नात मानपान केला नाही या कारणावरून पती व सासूने विवाहितेचा छळ केला, या छळाला कंटाळून अखेर सहाव्या मजल्यावरून उडी घेत तिने आयुष्य संपवले. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.28) ताथवडे, रामनगर या परिसरात घडली.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात प्रदीप नारायणराव जामीनदार (वय 68 रा. इंदोर) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून पती केशरीनंदण तेजनारायणलाल कर्ण (वय 33) व सासू दोघे राहणार ताथवडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या तीस वर्षे मुलीचा आरोपी याच्याशी विवाह झाला. यावेळी विवाहात मानपान केला नाही, जास्त वस्तू दिल्या नाहीत अशा कारणावरून पीडितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. तिला घराबाहेर न निघू देता तिच्यावर पाळत ठेवून तिच्यावर सतत संशय घेतला. घरच्यांच्या या त्रासाला कंटाळून अखेर तिने साहव्या मजल्यावरील राहत्या घराच्या बाल्कनीतून उडी घेत स्वतःचे आयुष्य संपवले. वाकड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.