पती आणि दिराने चोरली पत्नीची कार

0
221

आळंदी, दि. ११ (पीसीबी) – पत्नीने तिची कार मावस भावाच्या घरासमोर पार्क केली असता पती आणि दिराने कार चोरून नेली. ही घटना 13 मे रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन वाजताच्या कालावधीत आळंदी येथे घडली असून याबाबत 10 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती अमरेंद्र रापर्तीवार (वय 54), मावस दीर वीरेंद्र प्रभाकर अदमुलवार (रा. शाहूनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमरेंद्र यांच्या पत्नीने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती विभक्त राहतात. फिर्यादी यांनी त्यांची दोन लाख रुपये किमतीची कार (एमएच 30/एएफ 3239) मावस भाऊ विश्वजित संकपाळ यांच्या घरासमोर पार्क केली होती. तिथून आरोपींनी कार चोरून नेली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.