पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीचे आत्महत्या

0
77

चाकण, दि. 19 (पीसीबी) : पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली. ही घटना 13 ऑक्टोबर रोजी मेदनकरवाडी येथे घडली. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

लक्ष्मण मरिबा शिनगारे (वय 38, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या महिलेच्या बहिणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लक्ष्मण याने त्याच्या पत्नीला सतत मारहाण करून बँकेचे हप्ते भरण्यासाठी फिर्यादी यांच्याकडे पैसे मागण्यास सांगत असे. त्यानुसार फिर्यादी यांनी आरोपीला काही पैसे दिले होते. तरीही आरोपीने फिर्यादी यांच्या बहिणीचा शारीरिक व मानसिक छळ केला. शिवीगाळ दमदाटी करून मारहाण केली. या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. लक्ष्मण शिनगारे याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.