पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0
305

तळेगाव दाभाडे, दि. १५ (पीसीबी) – पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बालाजीनगर वराळे येथे घडली.

नम्रता बोर्डे (वय 18,  रा. वराळे, रा. मावळ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या आईने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती समाधान मधुकर बोर्डे (वय 22, रा. बालाजीनगर, वराळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान आणि नम्रता यांचे 15 फेब्रुवारी 2022 रोजी लग्न झाले. त्यानंतर एका महिन्याने स्वयंपाक, घरकाम नीट जमत नाही. आई वडिलांशी बोलायचे नाही, अशा कारणांवरून आरोपी पतीने विवाहितेला सतत शिवीगाळ, मारहाण करून तिच्याशी अबोला धरला. विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याने या त्रासाला कंटाळून 26 जून रोजी विवाहितेने राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.