पतीचा खून करून रचला गळफास घेतल्याचा बनाव

0
359

ताथवडे, दि. ८ (पीसीबी) – पतीचा खून करून गळफास घेतल्याचा बनाव रचला. याप्रकरणी पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 6) मध्यरात्री दोन वाजता ताथवडे येथे घडली.

अनिल उत्तमराव राठोड (वय 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अनिल यांची उषा अनिल राठोड पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिल यांचे भाऊ रविकुमार उत्तमराव राठोड (वय 32, रा. परभणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 7) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ मयत अनिल राठोड आणि त्यांच्या पत्नी ताथवडे येथील लोंढे वस्तीत तात्या लोंढे यांच्या खोलीत भाड्याने राहत होते. घरगुती भांडणाच्या कारणावरून सोमवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास उषा हिने अनिल यांच्या डोक्यात मारून त्यांचा खून केला.

खून केल्यानंतर उषा हिने अनिल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा बनाव केला. मात्र तिचा बनाव उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत