देहूरोड, दि. 13 (पीसीबी)
पतंग कापल्याच्या रागातून एका तरुणाने दुस-या तरुणाला दगडाने मारहाण करीत जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. ११) सायंकाळी गांधीनगर, देहूरोड येथे घडली.
रोहीत उमेश जेगरे (वय १९, रा. दत्त मंदिरजवळ शिवाजीनगर देहूरोड) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी रविवारी (दि. १२) याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आदित्य काळे (वय २०, रा. गांधीनगर, देहुरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी फिर्यादी रोहित आणि त्याचा मित्र अविनाश शिवपुरे असे दोघेजण खेड शिवापूर येथे देवदर्शनासाठी निघाले होते. ते मरीमाता मंदीर, गांधीनगर, देहुरोड येथे आले असताना त्यांच्या समोर आरोपी आदित्य काळे हा आला. दुपारी आदित्य याच्या पतंगाचा मांजा फिर्यादी राहित याच्या पतंगाचे मांज्यामुळे तुटल्याचा राग त्याच्या मनात होता. पतंग कापल्यावर तू मला का चिडवत होतास, असे म्हणून शिवीगाळ करुन फिर्यादी व त्याचा मित्र अविनाश शिवपुरे असे आम्हा दोघांनाही हाताने मारहाण केली. तेथे पडलेला दगड उचलून त्याने फिर्यादी रोहित याच्या डोक्यात मारुन जखमी करुन पळून गेला. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.