पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांच्या आत्महत्येचे गूढ

0
394

शिरवळ, दि. १४ (पीसीबी) : राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह सापडला आहे. नीरा नदीच्या पात्रात काल संध्याकाळपासून त्यांचा शोध सुरु होता. गुरुवारी सकाळपासून ते बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय होता. त्यानंतर गुरुवार संध्याकाळपासून पोलिसांनी नीरा नदीच्या पात्रात त्यांचा शोध घेत होते. घोरपडे यांच्या शोधासाठी एनडीआरएफकडून आज शोधमोहीम सुरु करण्यात येणार होती. एनडीआरएफचे जवान शशिकांत घोरपडे यांचा पाण्याखाली शोध घेण्याच्या तयारीत असतानाच नीरा नदीच्या पुलाच्या भिंतीलगत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, घोरपडे यांच्या आत्महत्येचे गूढ वाढत चालले आहे.

राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे परवा (12 ऑक्टोबर) दुपारी ते पुण्याहून सातारला जाण्यासाठी निघाले होते. मात्र पुण्याहून पुढे आल्यावर त्यांनी सारोळा गावाजवळ गाडी उभी केली. तिथून पुढे ते चालत नीरा नदीच्या दिशेने चालत गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत होते. त्यामुळे आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना होता. घोरपडे हे मूळचे साताऱ्याचे आहेत. गुरुवारी दुपारी ते पुण्याहून साताऱ्याला जाण्यासाठी निघाले होते. मात्र त्यानंतर शशिकांत घोरपडे यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे त्यांनी नीरा नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. नीरा नदीच्या पात्रात युद्धपातळीवर शशिकांत घोरपडे यांचा शोध सुरु होता.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधमोहिम सुरु
शशिकांत घोरपडे बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी दिली होती. गुरुवारी (13 ऑक्टोबर) पहाटे नातेवाईकांनी ही तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यात नीरा नदीच्या जवळ एका हॉटेलपासून एक व्यक्ती पुलाकडे जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे शशिकांत यांनीच नदीपात्रात उडी मारल्याचं स्पष्ट होत नव्हतं. घटनास्थळी घोरपडे यांचे नातेवाईक यासह राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील पोलीस नाईक गणेश लडकत, शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल बारेला दाखल झाले होते. त्यांच्या शोधासाठी महाबळेश्वर टेकर्स, शिरवळ शिरवळ रेस्क्यू टीम, भोर आपत्ती व्यवस्थापनचे, भोईराज जलआपत्ती असे एकूण 45 अधिकजणांकडून प्रयत्न सुरू होता.