पडीक शेतात जनावरे चरण्यास सोडल्यावरून हाणामारी

0
154

परस्पर विरोधात गुन्हे दाखल

महाळुंगे, दि. 16 जुलै (पीसीबी) – पडीक शेतात जनावरे चरण्यास सोडल्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना सोमवारी (दि. 15) सकाळी खेड तालुक्यातील हेद्रुज गावात घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

अनिल सन्तु बच्चे (वय 42, रा. हेद्रुज, ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रशांत उर्फ गोट्या भिकाजी बच्चे, भिकाजी तात्याबा बच्चे, दीपक भिकाजी बच्चे (सर्व रा. हेद्रुज, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अनिल यांनी ज्ञानेश्वर बच्चे यांचे शेत जनावरांना चरण्यासाठी घेतले आहे. त्या शेतात आरोपींनी त्यांची जनावरे सोडली. त्याबाबत अनिल यांनी जाब विचारला असता आरोपींनी अनिल यांना शिवीगाळ करून काठीने व लाथाबुक्य्यानी मारहाण केली. पोलिसांनी प्रशांत बच्चे याला अटक केली आहे.

याच्या परस्पर विरोधात प्रशांत भिकाजी बच्चे (वय 30) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश अनिल बच्चे, अनिल संतू बच्चे (वय 42, रा. हेद्रुज, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर बच्चे यांच्या पडीक शेतात जनावरे चरण्यास सोडल्यावरून आरोपींनी प्रशांत यांना शिवीगाळ करून दगडाने मारहाण केली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.