पक्ष सदस्य नोंदणी अभियान व पक्ष संघटनेचा विस्तार जोमाने करण्याचा निर्धार .. योगेश बहल

0
2

पिंपरी, दि. 1-
राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हाच्यावतीने शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता पक्षाची शहर कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी शहराध्यक्ष योगेश बहल होते. बैठकीस प्रमुख उपस्थिती आमदार आण्णा बनसोडे तसेच शहराचे नवनिर्वाचित निरिक्षक सुरेश पालवे, महिला निरिक्षक शितल हगवणे यांची प्रमुख उपस्थित होती. पक्षाची नुतन कार्यकारिणी जाहिर करणे, सदस्य नोंदणी अभियान शुभारंभ, आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या दृष्टीने शहरात पुन्हा एकदा महानगरपालिकेत एक हाती सत्ता आणण्यासाठी पक्ष संघटनात्मक बांधणी करण्यासाठी सदर बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी योगेश बहल आपल्या भाषणांत म्हणाले की, आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये महिलांना ५०% आरक्षण आरक्षण आहे त्यामुळे अधिकाधिक राष्ट्रवादीतील महिलांनी राजकारणामध्ये अधिक संख्येने सक्रीय होऊन आरक्षणाचा फायदा घ्यावा. यासाठी महिलाचे संघटन करावे, महिला दिनानिमित्त महिला सक्षमिकरण तसेच पक्षाच्यावतीने पक्षाची भूमिका समाजावून सांगावी, सभासद नोंदणी करावी, विविध उपक्रम राबवावेत. महिला, युवक व युवती, विद्यार्थी व सर्व सेल यांनी आगामी भविष्य काळात अधिक अग्रक्रमाणे जोमाने काम करावे, सर्वांनी पक्ष बळकटीच्या दृष्टीने आगामी निवडणूकीत आपले नेते सांगतील त्या पद्धतीने व त्यांच्या मार्गदर्शनाने आपण निवडणूकीस सामोरे जायचे आहे, तशी तयारी आपण सर्वांनी ठेवावी, याकरिता लाडकी बहीण योजना तसेच शासनाच्या विविध योजना महायुती सरकारच्यावतीने राबविण्यात आलेल्या योजना राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने जन सामान्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविणे कामी महिला बचत गट, महिला संघ, युवक, युवती, विद्यार्थी इतर सेल यांच्या विविध कार्यक्रमातून त्या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न करावे. महिला दिनानिमित्त आपल्या प्रभागांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे व घरोघरी राष्ट्रवादी विचार व विस्तार हा उपक्रम राबवावा, अशा सुचना यावेळी शहराध्यक्ष बहल यांच्याकडून पदाधिकारी यांना देण्यात आल्या.

शहराची नुतन कार्यकारिणी अजितदादांच्या मार्गदर्शनात लवकच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार अण्णा बनसोडे आपल्या भाषणात म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष योगेश बहल यांच्या नेतृत्वात चिंचवड,पिंपरी, भोसरी या तिन्ही मतदार संघात महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी योगेश बहल यांनी अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनात अतिशय चांगले काम केले आहे. शहरात मी राष्ट्रवादी पक्षाचा एकमेव आमदार असल्याने फक्त पिंपरी विधानसभाच नव्हे तर, चिंचवड आणि भोसरी विधानसभेतील जनसामांन्याच्या तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे विविध प्रश्नांच्या बाबतीत शासन दरबारी ज्या अडचणी येतील त्या सोडवण्याच्या दृष्टीने शहराध्यक्षांसह अजितदादा यांच्या मार्गदर्शनात त्या सोडविणेसाठी मी कटीबध्द आहे. आगामी महापालिकेच्या निवडणूकीच्या दृष्टीने पक्षाला व संघटनेला ताकद देण्याचे अभिवचन मी आज याठीकाणी सर्वांच्या साक्षीने देतो असे त्यांनी जाहीर केले.

पक्षाचे निरिक्षक सुरेश पालवे हे म्हणाले आपल्या पदाधिकारी यांनी केलेल्या सूचना मागण्या मी अजितदादा व पक्षाचे अध्यक्ष सुनिल तटकरे साहेब यांच्या पर्यंत पोहचवून, त्या सोडविण्याच्या अनुषंगाने संघटनेला बळ देण्याचे काम करेल.

यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, आमदार अण्णा बनसोडे, शहराचे निरीक्षक सुरेश पालवे, शितल हगवणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, शाम लांडे, संतोष बारणे, फजल शेख, मोरेश्वर भोंडवे, युवक अध्यक्ष शेखर काटे, विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, रोजगार व स्वयंरोजगार प्रदेशाध्यक्ष मेघा पवार, प्रदेश कार्याध्यक्ष ॲड.सचिन आवटे, मा.सभापती विजय लोखंडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नढे, संघटक सतीश दरेकर, पिंपरी विधानसभा संघटक नारायण बहिरवाडे, भोसरी विधानसभा संघटक प्रकाश सोमवंशी, माजी नगरसेवक अतुल शितोळे, भाऊसाहेब भोईर, राजू बनसोडे, उपमहापौर मोहम्मद पानसरे, जगन्नाथ साबळे, उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी, राजेंद्र जगताप, राजेंद्र साळुंखे, माजी नगरसेविका शमीम पठाण, निकिता कदम, उषा वाघेरे, उषा काळे, माई काटे, शांती सेन, लता ओव्हाळ, निलेश डोके, संजय आहेर, हरिभाऊ तिकोने, श्रीधर वाल्हेकर, तानाजी खाडे, बाबुराव शितोळे, रामआधार धारिया, माऊली सुर्यवंशी, गोरक्षनाथ पाषाणकर, बबन गाढवे, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, सविता धुमाळ, उज्वला ढोरे, चिंचवड विधानसभा अध्यक्षा संगीता कोकणे, महिला बचत गट महासंघ अध्यक्ष ज्योती गोफने, पुष्पा शेळके, वर्षा शेडगे, आशा शिंदे, गंगा धेंडे, संजय औसरमल, महेश झपके, श्रीकांत कदम, मनीषा गटकळ, रवींद्र ओव्हाळ, ॲड. संजय दातीर, विनोद वरखडे, डॅनियल दळवी, अकबर मुल्ला,निर्मला माने, अमोल भोईटे, शिरिश साठे, विकास साने, अश्विणी तापकीर, माधवी सोनार, दीपक साकोरे, माऊली मोरे, गोरोबा गुजर, संपत पाचुंदकर, राजेंद्रसिंग वालिया, अमोल भोईटे, सतीश क्षीरसागर, सुप्रिया सोळांकुरे, ॲड.राकेश गुरव, सुप्रिया काटे, कुशाग्र कदम,आशा मराठे, मेधा पळशीकर, रशीद सय्यद, अजहर खान, तुकाराम बजबळकर, शक्रुल्ला पठाण, मीरा कांबळे, इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.