पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी शपथ घेताच आळंदीत जय श्री राम जल्लोष

0
123

आळंदीत उंटावरून खडी साखर वाटप ; भंडाऱ्याची उधळण

आळंदी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच आळंदीत महायुती आणि भाजपचे वतीने जय श्रीराम चा जयघोष करीत एकाच जल्लोष करण्यात आला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी फटाक्याची आतषबाजी, भंडार्याची उधळण, उंटावरून साखर वाटप करीत माऊली मंदिरासमोर तसेच महाद्वारात एकच जल्लोष करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवडीचे स्वागत करीत एनडीए सरकार स्थापनेचे बॅण्डबाजाचे दणदणाटात जल्लोष केला. यावेळी माऊली मंदिर समोरील महाद्वार प्रांगणात कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. त्याचे थेट प्रक्षेपण करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांना दिलेली शपथ सोहळा पाहत आनंद व्यक्त करीत जल्लोष केला.
या प्रसंगी भाजपचे केंद्रीय समितीचे विशेष निमंत्रक डॉ. रामशेठ गावडे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, , किसान मोर्चाचे प्रमुख संजय घुंडरे, आळंदी शहर भाजपचे शहराध्यक्षा किरण येळवंडे, महायुती घटक पक्षाचे शहराध्यक्ष राहुल चव्हाण, रोहिदास कदम, बंडू नाना काळे, गणेश गरुड, आकाश जोशी, नितीन ननावरे, चारुदत्त प्रसादे, ज्ञानेश्वर बनसोडे, विभाग प्रमुख अमोल वीरकर, ज्ञानेश्वर घुंडरे, संगीता फफाळ, मंगला हुंडारे, संकेत वाघमारे, विशाल येळवंडे, शंतनू पोफळे, स्वामी संपत बवले, प्रीतम किर्वे, आनंद वडगावकर आदींसह युवक तरुण भाजपचे कार्यकर्ते यांनी मोठा जल्लोष केला. खडी साखर उंटावरून तसेच महाद्वारात केंद्रीय समिती समितीचे विशेष निमंत्रित डॉ. रामशेठ गावडे यांचे नियंत्रणात पदाधिकारी यांनी भाविक, नागरिकांना साखर वाटून झेंडा फिरवत आनंद व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी मिरवणुकीने आळंदीत जल्लोष करीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. पुन्हा मिरवणूक माऊली मंदिर मार्गे नगरप्रदक्षिणा मार्गावरून पुढे मार्गस्थ झाली.